आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आडते असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 27, 2026
Spread the love

पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी (दि. २२ मे) आयोजित करण्यात आला.

यावेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, उपाध्यक्ष (फ्रूट विभाग) रोहन जाधव, उपाध्यक्ष (तरकारी विभाग) संतोष कुंभारकर, उपाध्यक्ष (कांदा-बटाटा विभाग) अप्पासाहेब कोरपे, सचिव महेश शिर्के तसेच संचालक संजय वखारे, राजेंद्र सूर्यवंशी, सागर केदारी, राहुल भोसले, अनिकेत घोडेकर, रविंद्र कोलते आणि शरद गावडे यांनी उपस्थित राहून सत्कार स्वीकारला.

सत्कार समारंभानंतर मार्केट यार्डमधील व्यापार व्यवस्था तसेच व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आडते असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुंजीर यांनी दि पूना मर्चंट्स चेंबरच्या कार्याचे कौतुक करत संस्थेबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.

“दि पूना मर्चंट्स चेंबरकडून भविष्यातही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. व्यापारी हिताच्या निर्णय प्रक्रियेत आम्ही सक्रिय सहभाग घेऊ. आपल्या संस्थेप्रमाणेच आमच्या संस्थेमध्येही उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न राहील,” असे कुंजीर यांनी सांगितले.

या प्रसंगी चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रविण चोरबेले, उत्तम बाठिया, नवीन गोयल, दिनेश मेहता यांच्यासह इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.