आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘एक्साईज’ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न : युवक काँग्रेसचे आंदोलन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 1, 2026
Spread the love

पुणे : हडपसर आणि फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर युवक काँग्रेसने राज्य उत्पादन शुल्क विभागाविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

हडपसर आणि फुगेवाडी परिसरातील विषारी दारू दुर्घटनेनंतर युवक काँग्रेसने शनिवारी पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की व झटापट झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हडपसर आणि फुगेवाडी येथे विषारी दारूच्या सेवनामुळे १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन छेडले.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे माध्यम विभागाध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रभारी गणेश उबाळे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, सरचिटणीस भूषण रानभरे, महेश म्हेत्रे, विश्वजित जाधव, अथर्व सोनार, अभिषेक अवचर, निखिल मलके, विकास सुपनार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.