आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

शहरातील १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 3, 2026
Spread the love

पुणे : विषारी दारूमुळे शहरात अनेकांचा बळी गेल्याने राज्यात खळबळ उडाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलावर सर्व बाजूंनी टीका होऊ लागली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता शहर पोलीस दलातील १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांची पोनि. गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे (गुन्हे अन्वेषण विभाग) आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे (मुंबई शहर) यांची बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.