आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आज शाळेत तुमचा पहिला दिवस!

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 16, 2026
Spread the love

पुणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कोंढवा येथील किड्स अँड क्रेऑन्स प्ले स्कूल अँड डे केअरमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. “आज शाळेत तुमचा पहिला दिवस” या संकल्पनेतून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रंगीबेरंगी फुगे, आकर्षक सजावट आणि आनंदी वातावरणामुळे शाळेचा परिसर उत्साहाने फुलून गेला होता. नवीन मित्र, नवीन वर्ग आणि नवीन अनुभवांची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

शिक्षकांनी प्रेमळ पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय बनवला. यावेळी पालकांनीही शाळेच्या उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधांचे कौतुक केले.

खेळातून शिक्षण, संवादात्मक अध्यापन, प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम, मैदानी खेळ तसेच सामाजिक आणि भावनिक विकासावर भर देणारी शाळेची कार्यपद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे पालकांनी सांगितले.

“शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. हा दिवस आनंददायी, आत्मविश्वासपूर्ण आणि संस्मरणीय व्हावा यासाठी आम्ही विशेष नियोजन केले आहे,” असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.