लक्ष्मीपूजनाला शहरात आगीच्या ९४ घटना
गतवर्षीच्या दुप्पट घटना : फटाक्यांची आतीषबाजी जोरात, सुदैवाने कोणीही जखमी नाही
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पर्यावरणाची काळजी घ्या, रस्त्यावर फटाके उडवू नका, असा न्यायालयाने दिलेला आदेश असो किंवा फटाक्यांचा मर्यादित वापर करावा, असे करण्यात आलेले आवाहन असो; असे असतानाही पुणेकरांनी रविवारी जोरदार आतषबाजी करत लक्ष्मीपूजन धुमधडाक्यात साजरे केले. रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. याच काळात आगीच्या घटना अधिक घडल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी आगीच्या ४३ घटना घडल्या होत्या. यंदा त्यापेक्षा दुपटीहून अधिक म्हणजेच ९४ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या आगींमध्ये कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही.
दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी आगीची पहिली वर्दी अग्निशमन दलाकडे आली. त्यानंतर आज सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी शेवटची वर्दी आली. गुजरवाडी येथील थोपटेनगरमधील कंपनीत आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आगी विझवल्या.
आगीच्या घटनांची ठिकाणे व वेळ :
- ०३.१४ – कोंढवा, कडनगर चौक येथील पडीक इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग.
- ०४.३१ – धायरी, डीएसके विश्व येथे मोकळ्या मैदानातील गवताला आग.
- ०५.४० – शिवाजीनगर, शिरोळे रोड येथे झाडाला आग.
- ०६.२६ – काशेवाडी, हरकानगर येथे कचऱ्याला आग.
- ०६.५१ – येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ आग.
- ०७.२३ – सदाशिव पेठ, नागनाथ पार येथे गॅलरीत आग.
- ०७.३७ – वडगाव बुद्रुक येथे झाडाला आग.
- ०७.४३ – कात्रज, गोकुळनगर येथे घराच्या पझ्यावर आग.
- ०७.४४ – सातारा रोड, सिटीप्राईडसमोर कचऱ्याला आग.
- ०७.५९ – फुरसुंगी येथील गोदामात आग.
- ०८.०० – सिंहगड रोड, गोयल गंगा येथे गॅलरीत आग.
- ०८.०८ – कोथरूड, कृष्णा हॉस्पिटलजवळ गॅलरीत आग.
- ०८.१३ – नाना पेठ येथे घरात आग.
- ०८.१६ – भवानी पेठ येथे छतावरील ताडपत्रीला आग.
- ०८.१९ – खराडी, बीडी कामगार वसाहतीतील टेरेसवर आग.
- ०८.३३ – कात्रज-कोंढवा रोड, कृष्ण सागर हॉटेलसमोर झाडाला आग.
- ०८.३८ – टिंगरेनगर, लेन नंबर ७ बी येथे झाडाला आग.
- ०८.४२ – शुक्रवार पेठ, शिंदे आळी येथे घरात आग.
- ०८.४२ – खराडी, मुंढवा पुलापुढे इमारतीतील फ्लॅटला आग.
- ०८.४४ – गंज पेठ, मिठगंज पोलीस चौकीजवळ घरात आग.
- ०८.५४ – सातारा रोड, सिटीप्राईड, सोनावणे इंडस्ट्रीज येथे दुकानाला आग.
- ०८.५६ – खराडी, एचपी पेट्रोल पंपामागील इमारतीतील फ्लॅटला आग.
- ०८.५७ – पाषाण, सोमेश्वरवाडी येथे मोकळ्या मैदानातील गवताला आग.
- ०८.५८ – वारजे, आरएमडी कॉलेजजवळ घरात आग.
- ०९.०० – गंज पेठ येथे टेरेसवर आग.
- ०९.०३ – कोथरूड, पौड रोड येथे घरात आग.
- ०९.१० – एनडीए चौक, किसकिंदा नगर येथे घरात आग.
- ०९.१० – कल्याणीनगर, मारी गोल्ड सोसायटीत केबलला आग.
- ०९.१५ – टिंगरेनगर, लेन नंबर १० येथे झाडाला आग.
- ०९.१५ – बालेवाडी मेट्रो स्टेशनजवळ मोकळ्या जागेत आग.
- ०९.१५ – कोंढवा बुद्रुक येथे झाडाला आग.
- ०९.१८ – औंध, मेडीपॉईंट येथे झाडाला आग.
- ०९.१९ – कर्वेनगर, वेदांत नगरी येथे गवताला आग.
- ०९.२० – धनकवडी, सरस्वतीनगर येथे झाडाला आग.
- ०९.२५ – विमाननगर, एअरपोर्ट रोडवरील इमारतीतील फ्लॅटमध्ये आग.
- ०९.२८ – बाणेर, कळंबकर चौक येथे गॅलरीत आग.
- ०९.३० – बी. टी. कवडे रोड, सॅपरॉन हॉटेलसमोर झाडाला आग.
- ०९.३१ – शिवाजीनगर, भोसलेनगर येथे कचऱ्याला आग.
- ०९.३३ – धायरी, नर्हे रोड येथे झाडाला आग.
- ०९.३३ – कोथरूड, न्यू इंडिया स्कूल येथे गवताला आग.
- ०९.३७ – दगडूशेठ मंदिर, समाधान चौक येथे दुकानात आग.
- ०९.३८ – केशवनगर, लोणकर चौक येथे फ्लॅटमध्ये आग.
- ०९.४० – रेंजहिल्स चौक येथे घरात आग.
- ०९.४३ – कोथरूड, निरंजन सोसायटीत झाडाला आग.
- ०९.४३ – कोंढवा, इस्कॉन मंदिराजवळ फ्लॅटमध्ये आग.
- ०९.४९ – उंड्री, बिशप स्कूलमागे घरात आग.
- ०९.५० – सिंहगड रोड, माणिकबाग येथे गाडीला आग.
- ०९.५५ – रास्ता पेठ, शशिकांत डेअरीजवळ घरात आग.
- ०९.५५ – धानोरी रोड, लोकप्रिय नगरी येथे घराला आग.
- १०.०२ – एनडीए रोड येथे घरात आग.
- १०.०२ – धायरी, रायकर मळा येथे गाडीला आग.
- १०.१० – औंध, आंबेडकर वसाहत येथे कचऱ्याला आग.
- १०.१३ – कोथरूड, एकलव्य कॉलेज येथे झाडाला आग.
- १०.१३ – कोथरूड, डीपी रोड येथे झाडाला आग.
- १०.१८ – अप्पर इंदिरानगर येथे गवताला आग.
- १०.२३ – जनता वसाहत येथे कचऱ्याला आग.
- १०.२५ – पाषाण सर्कलसमोर गवताला आग.
- १०.२५ – मांजरी बुद्रुक येथे उसाला आग.
- १०.२६ – दौलतनगर, हायवेजवळ गवताला आग.
- १०.२९ – महंमदवाडी येथे झाडाला आग.
- १०.३६ – कोथरूड, आयडियल कॉलनी येथे गच्चीवर आग.
- १०.३७ – कात्रज, वंडर सिटी येथे गच्चीवर आग.
- १०.४६ – कात्रज-आंबेगाव येथे गोदामाला आग.
- १०.४८ – मंगळवार पेठ, वजनकाटा दुकानात आग.
- १०.५७ – खराडी गाव येथे घरात आग.
- ११.१२ – औंध गाव येथे इलेक्ट्रिक डीपीला आग.
- ११.२० – कोरेगाव पार्क, लिबर्टी सोसायटीत गच्चीवर आग.
- ११.३५ – खराडी गाव येथे दुकानात आग.
- ११.३७ – वारजे कॅनॉल रोड येथे गोदामाला आग.
- ११.३९ – कोंढवा, लुल्लानगर येथे फ्लॅटमध्ये आग.
- ११.४८ – शुक्रवार पेठ, राष्ट्रभूषण चौक येथे गॅलरीत आग.
- ११.५४ – आंबेगाव बुद्रुक, शिवसृष्टीमागे कचऱ्याला आग.
- ११.५६ – बालेवाडी स्टेडियममागे कचऱ्याला आग.
- १२.०१ – विमाननगर, रोहन मिथिला सोसायटी येथे गवताला आग.
- १२.०२ – हडपसर, तुकाई दर्शन येथे कचऱ्याला आग.
- १२.१४ – कोंढवा खुर्द, भाजी मंडईतील टपरीला आग.
- १२.३८ – नवले पुलाजवळ कचऱ्याला आग.
- १२.४१ – धायरी, हॉटेल मुरली येथे गवताला आग.
- १२.४४ – येरवडा भाजी मंडई येथे कचऱ्याला आग.
- १२.५२ – अप्पा बळवंत चौक येथे झाडाला आग.
- ०१.०० – सहकारनगर, शिंदे गार्डन येथे गवताला आग.
- ०१.११ – धानोरी, परांडेनगर येथे कचऱ्याला आग.
- ०१.१३ – धायरी, लेन नंबर २० येथे गवताला आग.
- ०१.१७ – कोंढवा बुद्रुक येथे कचऱ्याला आग.
- ०१.२६ – मच्छी मार्केटजवळ आग.
- ०१.४८ – कोंढवा खुर्द, महंमदवाडी येथे कचऱ्याला आग.
- ०२.०८ – कात्रज, जैन मंदिर दुगड शाळेच्या शेडला आग.
- ०२.४९ – सिंहगड रोड, माणिकबाग, ब्रह्मा हॉटेलसमोर दुकानाला आग.
- ०३.०८ – गणेश पेठ, मच्छी मार्केटच्या बेसमेंटमध्ये आग.
- ०४.१७ – बोट क्लब रोड येथे घराला आग.
- ०५.५० – सनसिटी, माणिकबाग येथे झाडाला आग.
- ०६.०५ – नाना पेठ, किराड हॉस्पिटलजवळ उसाच्या गुऱ्हाळाला आग.
- ०६.२४ – वारजे माळवाडी, एनडीए रोड येथे दुकानाला आग.
- ०६.४५ – गुजरवाडी, थोपटेनगर येथील कंपनीत आग.
