आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रेकॉर्डवरील गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 18, 2026
Spread the love

पुणे : दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे.

अमन अंबीर झारेकरी (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पूल, सिंहगड रोड) असे या गुंडाचे नाव आहे. त्याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

अमन झारेकरी याच्यावर घातक हत्यार बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे, तोडफोड करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे तसेच अग्निशस्त्र बाळगणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याची गुन्हेगारी वृत्ती कमी झाली नाही. त्यामुळे सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता.

या प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमन झारेकरी याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार पंकज देशमुख आणि पोलीस अंमलदार अरविंद धावडे यांनी केली.