आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन SIMMC ला IIRF 2026 मध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय मानांकन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 18, 2026
Spread the love

पुणे : पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) ने इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF) 2026 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर मानांकन मिळवले आहे. या यशामुळे संस्थेचे व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील स्थान अधिक भक्कम झाले आहे.

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) या संस्थेने ‘इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (IIRF) 2026 च्या क्रमवारीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

त्यामुळे भारतातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्थांमध्ये सूर्यदत्तचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

‘एज्युकेशन पोस्ट’ मासिकातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या IIRF 2026 क्रमवारीनुसार, SIMMC ने भारतातील टॉप 15 वेगाने प्रगती करणाऱ्या बी-स्कूल्समध्ये राष्ट्रीय स्तरावर 14 वा क्रमांक मिळवला आहे.

तसेच, सर्वोत्तम बिझनेस स्कूल्सच्या एकूण क्रमवारीत संस्थेला देशात 43 वे आणि महाराष्ट्रात 12 वे स्थान प्राप्त झाले आहे.

हे मानांकन संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, उद्योग क्षेत्राशी असलेली सांगड, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली वचनबद्धता अधोरेखित करते.

ही क्रमवारी प्लेसमेंट, अध्यापन पद्धती, संशोधन, इंडस्ट्री इंटरॅक्शन आणि जागतिक दृष्टीकोन या निकषांवर आधारित आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न, AICTE मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेली SIMMC संस्था एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए यांसारखे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम राबविते. संस्थेला नॅक (NAAC) कडून ‘A’ ग्रेड प्राप्त झाली असून नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘स्वायत्त संस्था’ (Autonomous Status) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या स्वायत्ततेमुळे संस्थेला उद्योगांच्या गरजांनुसार आधुनिक अभ्यासक्रम विकसित करणे तसेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धती प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी सूर्यदत्तने ‘इंडस्ट्री 4.0 इनोव्हेशन लॅब’ तसेच सिंगापूरच्या CEAI च्या सहकार्याने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत विविध मूल्यवर्धित प्रमाणपत्र अभ्यासक्रमही संस्था राबवत आहे.

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी SIMMC ने एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (थायलंड), लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेज (मलेशिया), क्वांगवून युनिव्हर्सिटी (दक्षिण कोरिया), हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग आणि सिटी ऑफ ग्लासगो कॉलेज (स्कॉटलंड) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार (MoU) केले आहेत. संस्थेच्या कॅम्पस रिक्रूटमेंट कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.

या यशाबद्दल सूर्यदत्त ग्रुपच्या व्यवस्थापनाने SIMMC चे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.