आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मार्केटयार्डातील दुकानातून वेलदोडे, रोकड चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 19, 2026
Spread the love

पुणे : मार्केटयार्डातील भुसार बाजारातील एका दुकानाची जाळी तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड तसेच ४ किलो हिरवे वेलदोडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत भुसार बाजारातील व्यापारी संतोष कन्हैयालाल बोगावत (वय ५१, रा. हायड पार्क, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगावत यांचे मार्केटयार्डातील भुसार बाजारात दुकान आहे. १३ जून रोजी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करण्यात आले होते.

त्यानंतर १५ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता दुकान उघडण्यात आले. या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजावरील जाळी उचकटून आत प्रवेश केला.

गल्ल्यातील १० हजार रुपयांची रोकड तसेच ४ किलो वेलदोडे असा २२ हजार रुपयांचा माल चोरून नेला. पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.