सूर्यदत्तचा ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ उपक्रम
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाच्या माध्यमातून जागतिक शांततेचा संदेश : बहुभाषिक योग प्रोटोकॉल व मानवी तिरंगा ठरणार आकर्षण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे बावधन येथील सूर्यदत्त कॅम्पसमध्ये ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगाच्या माध्यमातून जागतिक शांतता, एकात्मता आणि सर्वांगीण आरोग्याचा संदेश देणारा हा उपक्रम एक अनोखा बेंचमार्किंग विश्वविक्रम ठरणार आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बावधन येथील सूर्यदत्त कॅम्पसमध्ये ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगाच्या माध्यमातून जागतिक शांतता, एकात्मता आणि सर्वांगीण आरोग्याचा संदेश देणारा हा उपक्रम एक अनोखा बेंचमार्किंग विश्वविक्रम ठरणार आहे.
“विविधतेतून शांततेकडे सामंजस्यपूर्ण वाटचाल” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा उद्देश भाषा, संस्कृती, धर्म आणि भौगोलिक सीमा यापलीकडे जाऊन मानवतेला एकत्र आणणे हा आहे. योगाच्या सार्वत्रिक संदेशातून शांतता, समावेशकता आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
या भव्य कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून २०२६ हून अधिक सहभागी सहभागी होणार आहेत. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, योगप्रेमी तसेच सूर्यदत्त परिवारातील हजारो सदस्य या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बहुभाषिक योग प्रोटोकॉल. योगाच्या विविध टप्प्यांचे मार्गदर्शन भारतातील विविध भाषांमध्ये करण्यात येणार असून भारताच्या समृद्ध भाषिक व सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविण्यात येणार आहे. यामुळे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला अधिक बळ मिळणार आहे.
याशिवाय सहभागींच्या उपस्थितीत भव्य मानवी तिरंगा (ह्युमन तिरंगा फॉर्मेशन) साकारण्यात येणार असून राष्ट्रप्रेम, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे.
या कार्यक्रमात सामूहिक योगाभ्यास, ध्यानसाधना, शांतता प्रतिज्ञा, प्रेरणादायी मार्गदर्शन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि आरोग्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि शांततामय जीवनशैली आहे, हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ हा उपक्रम सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सर्वांगीण शिक्षण, राष्ट्रनिर्माण, सामाजिक उत्तरदायित्व आणि जागतिक शांततेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, योगप्रेमी, विविध संस्था आणि सामाजिक संघटनांना आयोजकांनी खुले निमंत्रण दिले आहे. बहुभाषिक योग प्रोटोकॉल, भव्य मानवी तिरंगा आणि मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.
योग हा व्यक्ती, समाज आणि राष्ट्रांना जोडणारा प्रभावी दुवा आहे. आजच्या विभाजित होत चाललेल्या जगात शांततेची सुरुवात स्वतःपासून होते. भाषा, परंपरा आणि संस्कृती वेगळ्या असू शकतात; मात्र शांततेची सुरुवात एका श्वासापासूनच होते. ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’च्या माध्यमातून हजारो लोकांना एकत्र आणून जागतिक शांतता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष
