आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ला महेश नळे यांच्या पुढाकारातून प्री-रिजन स्टाफ मीटिंग

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 22, 2026
Spread the love

सोलापूर : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234-D1 अंतर्गत रिजन-१ ची प्री-रिजन स्टाफ मीटिंग आज सोलापूर येथील पूनम भोज, लकी चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. 3234 D1 डिस्ट्रिक्टच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची प्री-रिजन स्टाफ मीटिंग आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

रीजन १ चे नियुक्त रिजन चेअरमन लायन डॉ. महेश नळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस 3234 D1 चे इलेक्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शहा-कांसवा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

वर्षाच्या प्रारंभीच रिजनमधील झोन चेअरमन, कॅबिनेट अधिकारी व विविध विभाग प्रमुखांना एकत्र आणून आगामी सेवा वर्षाचे नियोजन करण्याचा हा अभिनव प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत DCT (Designate) ला. सुरेश जाजू, झोन चेअरमन-१ ला. अमिता कारंडे, झोन चेअरमन-२ ला. स्वामिनाथ कलशेट्टी, झोन चेअरमन-४ ला ला. उमेश अटपडीकर, ला डॉ. अभिजित जोशी, ला. डॉ. राहुल चांडक, ला. ॲड. श्रीनिवास कटकुर (D.C. GMT), ला. अतुल सोनिग्रा (D.C. LCIF), ला. संतोष काबरा (D.C. LCIF Legacy Program) तसेच लिओ डिस्ट्रीक चेअरमन ला. प्रकाश फुरडे यांनी आपल्या विभागांचे सादरीकरण करून आगामी वर्षातील उद्दिष्टे व सेवा प्रकल्पांची माहिती दिली.

यावेळी लिओ लायन कॅबीनेट लायजन शुभम उर्फ पवन श्रीश्रीमाळ यांनी रिजन-१ मधील सर्व लायन्स क्लबमध्ये लिओ क्लब व लिओ-लायन क्लबची संख्या वाढविणे, युवकांना सेवाकार्यात सहभागी करून घेणे आणि “आजचा Leo हा उद्याचा Lion” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

बैठकीस माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, ला. अरविंद कोणशिरसगी, ला. राजशेखर कापसे तसेच मल्टिपल व्हाईस प्रेसिडेंट ला. ॲड. ए. के. पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.

उपस्थित मान्यवरांनी रिजन-१ च्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे कौतुक करत आगामी सेवा वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करताना इलेक्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शहा-कांसवा यांनी रिजन-१ च्या या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

डिस्ट्रिक्टमध्ये प्रथमच अशा प्रकारे प्री-रिजन स्टाफ मीटिंग आयोजित करण्यात आल्याबद्दल त्यांनी रिजन १ चे इलेक्ट रिजन चेअरमन ला. डॉ. महेश नळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

या बैठकीमुळे सेवा, प्रशासन आणि नेतृत्व विकासाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लायन्स इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठ्या सेवा संस्थांपैकी एक संस्था असून २०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. \दृष्टी संवर्धन, मधुमेह जनजागृती, भूकमुक्ती, पर्यावरण संवर्धन, बालकर्करोग, युवक विकास आणि आपत्ती निवारण या क्षेत्रांत संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहे.

त्याच सेवाभावी परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी रिजन-१ च्या या बैठकीत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. बैठकीस रिजन-१ मधील सोलापूर जिल्ह्यातील विविध लायन्स क्लबचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, झोन चेअरमन, कॅबिनेट अधिकारी, लिओ व लिओ-लायन पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या समारोपप्रसंगी RCS (Designate) लायन गंगाप्रसाद बंडेवार यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक आभार प्रदर्शन न करता ते म्हणाले, “मी आज आभार प्रदर्शन करणार नाही. आभार प्रदर्शन केले की कार्यक्रम संपतो आणि नातीही तुटतात.

आपल्याला संपूर्ण वर्षभर एकत्रितपणे काम करायचे आहे. वर्षभर सेवा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच मी सर्वांचे आभार मानेन.” त्यांच्या या आगळ्यावेगळ्या वक्तव्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.