आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लोहगडावर अपघात नाही तर खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 23, 2026
Spread the love

होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या केतन विशाल अग्रवाल (वय २६, रा. गहुंजे) यांचा दरीत पडून मृत्यू झाला. सोसायट्याचा वारा आल्याने तोल जाऊन ते दरीत पडल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांची भावी पत्नी आणि तिच्या मित्राने केतन अग्रवाल यांना दरीत ढकलून देऊन त्यांचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या तरुणीला आणि तिच्या मित्राला ताब्यात घेतले असून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना हा अपघात नसून खून असल्याचा संशय आला.

त्यानंतर पोलिसांनी सिया प्रवीण बसेसर गोयल हिची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान पोलिसांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना ती गोंधळली.

त्यानंतर तिने केतन यांना दरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाह होणार होता.

त्यासाठी दोन विमाने बुक करण्यात आली होती. तसेच १४ कोटी रुपये खर्चून राजमहाल बुक करण्यात आला होता. केतन यांचे वडील विशाल अग्रवाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत.