आयआयआरएफ २०२६ रँकिंगमध्ये SIBMTचा गौरवशाली प्रवास कायम
महाराष्ट्रात १७ वा तर भारतात ५६ वा क्रमांक : देशातील अग्रगण्य बिझनेस स्कूल्समध्ये स्थान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (SIBMT), पुणे यांनी इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF) २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात १७वा आणि भारतात ५६वा क्रमांक मिळवला आहे. संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, उद्योगाभिमुख दृष्टिकोन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना या मानांकनाद्वारे गौरवण्यात आले आहे.
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (SIBMT), पुणे यांनी इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF) २०२६ च्या ‘बेस्ट बिझनेस स्कूल्स ओव्हरऑल’ श्रेणीत उल्लेखनीय यश संपादन करत भारतात ५६वा, तर महाराष्ट्रात १७वा क्रमांक मिळवला आहे.
हे मानांकन एज्युकेशन पोस्ट मॅगझिनद्वारे जाहीर करण्यात आले. हे यश संस्थेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, उद्योगाभिमुख शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक मानले जात आहे.
आयआयआरएफ ही भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि बहुआयामी रँकिंग प्रणालींपैकी एक मानली जाते. या रँकिंगसाठी प्लेसमेंट कामगिरी, अध्यापन पद्धती व शैक्षणिक संसाधने, संशोधन, उद्योग-संलग्नता, प्लेसमेंट सहाय्य, भविष्याभिमुखता तसेच बाह्य प्रतिमा आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन अशा सात प्रमुख निकषांचा विचार करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न, एआयसीटीई मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र शासनमान्य SIBMT मध्ये MBA, MCA, BBA आणि BCA हे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
संस्थेला NAAC मानांकन प्राप्त असून AICTE-CII इंडस्ट्री लिंक्ड सर्व्हेमध्ये प्लॅटिनम श्रेणीचा बहुमानही मिळाला आहे. सूर्यदत्त समूहाची अध्यापन पद्धती अनुभवाधारित, सर्वांगीण, संशोधनाधारित, विद्यार्थी-केंद्रित आणि आनंददायी शिक्षणावर आधारित आहे.
विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अध्ययन दौरे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी संस्थेत इंडस्ट्री ४.० इनोव्हेशन लॅबची स्थापना करण्यात आली आहे.
तसेच CEAI, सिंगापूर यांच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) उत्कृष्टता केंद्रही सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) उद्दिष्टांशी सुसंगत राहून SIBMT विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मूल्यवर्धित प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविते.
याशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि संस्थांसोबत सामंजस्य करार (MoU) करून संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी सूर्यदत्त सातत्याने प्रयत्नशील असून कॅम्पस रिक्रूटमेंट कार्यक्रमाद्वारे विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग सुनिश्चित केला जातो.
आयटी, वित्तीय सेवा, विमा, रिटेल, कन्सल्टिंग, रिअल इस्टेट, औषधनिर्माण, ऑटोमोबाईल, टेलिकॉम आणि अॅग्री-बिझनेससह विविध क्षेत्रांत सूर्यदत्तचे विद्यार्थी यशस्वीपणे कार्यरत आहेत.
सूर्यदत्त समूहाच्या व्यवस्थापनाने या यशाबद्दल SIBMT चे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील सहकारी आणि सर्व हितचिंतकांचे अभिनंदन केले आहे.
व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण दखल असून भविष्यातही नवे उच्चांक गाठण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे व्यवस्थापनाने नमूद केले.
IIRF २०२६ मध्ये SIBMT ला महाराष्ट्रात १७वा आणि भारतात ५६वा क्रमांक मिळाल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. हे यश गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, उद्योगाभिमुखता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. आमचे विद्यार्थी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी, उद्योग भागीदार आणि हितचिंतक यांच्या सामूहिक योगदानामुळेच हे यश शक्य झाले आहे. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
