आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लाच लुचपतच्या अपर पोलीस महासंचालकपदी रवींद्र सिंघल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 24, 2026
Spread the love

पुणे : शासनाने आज अतिवरिष्ठ व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नागपूर शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. नांदेडचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.