प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्यदत्तचे ६५ समाजोपयोगी उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या शनिवार (दि. २७ जून) रोजी साजऱ्या होत असलेल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजतर्फे “६५ वर्षे – ६५ समाजोपयोगी उपक्रम” या विशेष समाजकल्याण अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. समाजाला काहीतरी भरीव परत देण्याच्या भावनेतून सेवा, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारे विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, औषधी वनस्पती संवर्धन, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता अभियान, खादी व ज्यूट पिशव्यांचे वितरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पक्षी संवर्धन, ई-कचरा संकलन, सौर ऊर्जा जनजागृती, कागद पुनरुत्पादन, हरित संकल्प आणि पर्यावरणपूरक गणपती निर्मितीचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
तसेच गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट, आदिवासी विद्यार्थ्यांना सायकली, बेघर नागरिकांना चादरी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, स्वयंसेवी संस्थांना मदत, अनाथाश्रम व वृद्धाश्रम सेवा, मोफत भोजन, पाणपोई, प्रॉडक्ट बँक, फूड बँक, क्लोदिंग बँक, नॉलेज बँक, गोसेवा, दिव्यांग सहाय्य आणि दान अभियान आयोजित करण्यात येणार आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोफत रेनकोट, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार किट, विश्राम सुविधा आणि फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आरोग्य क्षेत्रात मेगा रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, नर्सिंग सेवा, फार्मसी मार्गदर्शन, सीपीआर प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्य जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी डिजिटल, सायबर आणि आर्थिक साक्षरता अभियान, कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत, नर्सिंग शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य वाटप, मराठी भाषा संवर्धन, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मोफत इंग्रजी संभाषण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.
तसेच महिलांसाठी हॉटेल मॅनेजमेंट, कुकिंग, शिवणकला, फॅशन डिझायनिंग, ब्युटी अँड वेलनेस, अन्न प्रक्रिया प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मदत, स्टार्टअप व बिझनेस मेंटॉरिंग आणि राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानून गरजू पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व, पत्रकार कुटुंबांना वैद्यकीय मदत, पत्रकार सन्मान सोहळे, पाल्यांसाठी विविध स्पर्धा, आधुनिक मीडिया तंत्रज्ञानावरील राज्यस्तरीय अधिवेशन, तज्ज्ञांची व्याख्याने आणि उत्कृष्ट पत्रकारांचा गौरव यांसारखे विशेष पत्रकार कल्याण उपक्रमही या अभियानाचा महत्त्वाचा भाग असणार आहेत.
यावेळी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची मोठी संधी आहे.
सेवा, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्व हीच सूर्यदत्तची ओळख असून ‘६५ उपक्रम’ ही संकल्पना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत, आनंद आणि प्रेरणा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
सूर्यदत्त व सूर्यभारत परिवाराने विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि सर्व सुजाण नागरिकांना या “सेवेच्या उत्सवा”त सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
