सूर्यदत्तचा दबदबा कायम! MSBTE इंटिरिअर डिझाईन परीक्षेत घवघवीत यश
गुणवंत विद्यार्थ्यांनी कायम राखली यशाची परंपरा : उद्योगाभिमुख शिक्षणाची पुन्हा एकदा यशस्वी साक्ष
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिक्षणातील गुणवत्ता, सर्जनशीलता आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची परंपरा जपत सूर्यदत्त समूहाच्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजी (PIAT) स्कूल ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या (MSBTE) उन्हाळी २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालाने सूर्यदत्तच्या गुणवत्तापूर्ण आणि उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
अंतिम वर्षात अभिषेक शर्मा (८६.०० टक्के) यांनी प्रथम, भोमाराम सुथार (८५.३३ टक्के) यांनी द्वितीय आणि माधवी तुपे (८५.०० टक्के) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
प्रथम वर्षात आदित्य कात्रे (९०.८० टक्के) यांनी प्रथम, अथर्व ढोले (८९.६० टक्के) यांनी द्वितीय आणि आशीष विश्वकर्मा (८६.०० टक्के) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
अंतिम वर्षातील अभिषेक शर्मा आणि प्रथम वर्षातील आदित्य कात्रे यांनी आपल्या वर्गात प्रथम क्रमांक मिळवत सूर्यदत्तच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया तसेच उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दहावीनंतर प्रवेश घेऊन विद्यार्थी अल्पवयातच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करू शकतात. दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतंत्र इंटिरिअर डिझायनर म्हणून काम करू शकतात किंवा नामांकित आर्किटेक्ट्स व इंटिरिअर डिझायनर्ससोबत प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवू शकतात.
सूर्यदत्तचे अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशातील नामांकित आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझाईन कंपन्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत.
संस्थेचे उद्योगाभिमुख शिक्षण आणि मजबूत माजी विद्यार्थी नेटवर्क विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी सक्षम बनवत आहे. प्रथम वर्षातील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आदित्य कात्रे म्हणाला, “सूर्यदत्तमधील प्राध्यापकांचे मार्गदर्शन, वैयक्तिक लक्ष आणि सर्वांगीण शिक्षणामुळेच हे यश शक्य झाले.”
अंतिम वर्षातील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी अभिषेक शर्मा म्हणाला, “आमच्या शिक्षकांनी आम्हाला केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष व्यावसायिक जगासाठी सक्षम केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळेच हे यश मिळाले.”
प्राचार्य अजित डी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन करताना सांगितले, “ही उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्राध्यापकांच्या समर्पणाची आणि सूर्यदत्तच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची साक्ष आहे.
भविष्यातही ही यशाची परंपरा अशीच कायम राहील, असा विश्वास आहे.” सूर्यदत्तच्या PIAT स्कूल ऑफ डिझाईनमधून शिक्षण पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये यशस्वी इंटिरिअर डिझायनर म्हणून कार्यरत असून, आपल्या उत्कृष्ट कार्यातून सूर्यदत्तच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ठसा उमटवत आहेत.
योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी यांच्या बळावर विद्यार्थी यशाची नवी शिखरे गाठतात. सूर्यदत्तमध्ये आम्ही केवळ शिक्षणच देत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, व्यावसायिक कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देतो. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
विद्यार्थ्यांचे समर्पण आणि प्राध्यापकांचे अथक मार्गदर्शन यामुळेच ही यशाची परंपरा कायम आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल व्यावसायिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी ठरेल. – सुषमा चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव
