आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीत नवीन लिओ-लायन्स क्लबची स्थापना; संस्थापक पदाधिकाऱ्यांची निवड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 29, 2026
Spread the love

बार्शी : ११ जुलै २०२१ रोजी लायन्स क्लब बार्शी टाउनच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या लिओ क्लब बार्शी टाउनने सेवा, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची पाच वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. क्लबचे रूपांतर आता लिओ-लायन्स क्लब बार्शी टाउन युथमध्ये झाले असून, लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१ मधील हा पहिलाच लिओ-लायन्स क्लब ठरला आहे.

गेल्या पाच वर्षांत क्लबने रक्तदान शिबिरे, मतदान ओळखपत्र व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, महिला सक्षमीकरण, प्राणी संवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरे, अतिवृष्टी भागात मदत शालेय साहित्य वितरण, अन्नधान्य वाटप तसेच युवकांसाठी नेतृत्व विकास उपक्रम यशस्वीपणे राबवून बार्शीसह संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

क्लबच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थापक अध्यक्ष लिओ-लायन शुभम (पवन) संजय श्रीश्रीमाळ यांची मल्टिपल डिस्ट्रिक्ट ३२३४ (मुंबई विभाग वगळता) च्या लिओ महाराष्ट्र अध्यक्षपदी ऐतिहासिक निवड झाली.

तसेच त्यांना लायन्स इंटरनॅशनलचा ‘लिओ ऑफ द इयर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. यानंतर लिओ क्लब बार्शी टाउनचे रूपांतर लिओ-लायन्स क्लब बार्शी टाउन युथमध्ये करण्यात आले असून, डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१ मधील हा पहिलाच लिओ-लायन्स क्लब ठरला आहे.

क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा नूतन शपथविधी व पदग्रहण समारंभ रविवार, २६ जुलै रोजी उपळाई रोड, बार्शी येथील हॉटेल देशपांडे हॉल येथे मालपाणी समूहाचे संचालक व लायन्स मल्टिपल पास्ट कौन्सिल चेअरमन PMJF ला. गिरीश मालपाणी व लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-रच्या सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर MJF ला. सुनिता मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या क्लबच्या स्थापनेसाठी लायन्स क्लब बार्शी टाउनचे अॅडव्हायझर लायन प्रकाश फुरडे, ३२३४ डी १ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला राजेंद्र कासवा शहा रिजन चेअरमन महेश नळे, झोन चेअरपर्सन ला. अर्चना आवटे, ला. अतुल सोनीग्रा, अध्यक्ष ला. आदित्य कोठारी, विनोद बुडूक, रवी बजाज, आनंद पुण्या तसेच लायन्स क्लब वाशी टाउन आणि लिओ-लायन्स क्लब बार्शी टाउन युथच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.