आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लुल्लानगरच्या कॅफेमध्ये केतनच्या हत्येचा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 2, 2026
Spread the love

पुणे : केतन अगरवाल याला दरीत ढकलून हत्या करण्यापूर्वी आदल्या दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये कट रचल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सकाळी सिया गोयल हिला संबंधित कॅफेमध्ये आणले.

सिया आणि चेतन यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्लानगरमधील एका मोकळ्या जागेत दोन वेळा सराव केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येच्या आदल्या दिवशी सिया आणि चेतन हे लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये भेटले होते. तेथे त्यांनी केतनला मारण्याचा कट रचला. त्यानंतर लुल्लानगरमधील मोकळ्या जागेत केतनला लोहगडावरून दरीत कसे ढकलायचे, याचा सरावही त्यांनी केला होता. केतनला गड-किल्ल्यांवर फिरण्याचा छंद असल्याने आरोपींनी त्याच्या हत्येसाठी लोहगड किल्ल्याची निवड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुरुवारी सकाळी पोलिसांनी सिया गोयल हिला संबंधित कॅफेमध्ये नेले. व्हायरल झालेल्या व्हिडिओतील हा तोच कॅफे आहे का, सिया आणि चेतन नेमके कुठे बसले होते, ते तेथे किती वेळ थांबले होते, तसेच त्या वेळी त्यांनी कोणाशी काही संवाद साधला होता का, याबाबतची माहिती पोलिसांनी तिच्याकडून घेतली आणि त्याची पडताळणी केली.