आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची घोषणा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 4, 2026
Spread the love

भूम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप अनंत साठे, तर कोषाध्यक्षपदी सचिन महादेव साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यंदाची जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

भूम शहरातील साठेनगर येथील समाजमंदिरात लक्ष्मण साठे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक विषयांवरील व्याख्याने, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, गरजू कुटुंबांना धान्य वाटप, अन्नदान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

बैठकीत सर्वानुमते प्रदीप अनंत साठे यांची अध्यक्षपदी, नितीन पांडुरंग साठे यांची उपाध्यक्षपदी, सचिन महादेव साठे यांची कोषाध्यक्षपदी आणि विशाल विलास शिंदे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

यावेळी आकाश साठे, कुणाल साठे, ओम साठे, उमेश साठे, दत्ता साठे, बालाजी साठे, निलेश साठे, सुजित साठे, राम साठे, गणेश गायकवाड, सुमित साठे, साहिल साठे, यश चव्हाण, अभिजित साठे, कुणाल आडागळे, संतोष जाधव आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.