एमएसबीटीई परीक्षेत सूर्यदत्तच्या डी. फार्मसी विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी
उन्हाळी २०२६ परीक्षेत उज्ज्वल यश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आयोजित उन्हाळी २०२६ परीक्षेत बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी अँड हेल्थकेअर रिसर्चच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा कायम राखली असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाविद्यालयाने आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाभिमुख शिक्षण, उद्योग-संलग्न प्रशिक्षण आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धतीच्या बळावर सातत्याने गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा जपली आहे. नियमित अध्यापन, अनुभवी प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन, प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण, औद्योगिक भेटी, व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, संशोधन प्रकल्प आणि कौशल्यविकास उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सौ. सुषमा चोरडिया, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संपूर्ण सूर्यदत्त परिवाराने अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी अँड हेल्थकेअर रिसर्चमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधनाभिमुख वातावरण, उद्योग-संलग्न प्रशिक्षण, कौशल्यविकास कार्यक्रम, स्टार्टअप व उद्योजकतेला प्रोत्साहन, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगाराभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम केले जात असून, गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षणाची ही यशस्वी वाटचाल भविष्यातही कायम राहणार असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
“विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल हा त्यांच्या जिद्दीचा, पालकांच्या विश्वासाचा आणि शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांचा संगम आहे. ज्ञान, कौशल्य, मूल्ये आणि व्यावसायिक नैतिकता यांचा समतोल साधणारे सक्षम आरोग्यसेवा व्यावसायिक घडविण्याचे कार्य सूर्यदत्तमध्ये सातत्याने सुरू आहे.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
सूर्यदत्तमध्ये शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते. विद्यार्थ्यांचे हे यश संपूर्ण सूर्यदत्त परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. – सुषमा चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव
