आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यात एका दिवसात २९ झाडपडीच्या घटना

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 4, 2026
Spread the love

पुणे : सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे शुक्रवार सकाळपासून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत शहरात २९ झाडपडीच्या घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कार व दुचाकींचे मोठे नुकसान झाले. तसेच, रस्त्यावर झाडे पडल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी जाऊन पडलेली झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले.