आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खडकवासला धरणातून २७ हजार २०० क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 8, 2026
Spread the love

पुणे : धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरले असून मध्यरात्री १२ वाजल्यापासून धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळपासून २७ हजार २०० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून मुठा नदीला पूर आला आहे. ओंकारेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. तसेच सिंहगड रोडवरील एकतानगरीतील जलपूजन, द्वारका आणि शारदा सरोवर सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.

अग्निशमन दलाची दोन वाहने आणि बोट घटनास्थळी दाखल झाली असून नागरिकांना सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यात येत आहे. महापौर मंजुषा नागपूरे या पहाटे ५ वाजल्यापासून नदीकाठच्या परिसरात फिरून पूरस्थितीची पाहणी करत प्रशासनाला सूचना देत आहेत.

त्यांनी रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकतानगरी आणि निंबज नगर परिसराची पाहणी केली. येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची तयारी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.