आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सूर्यदत्त हॉस्पिटॅलिटी कॉलेजची उत्कृष्ट दर्जाची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप व प्लेसमेंट

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 9, 2026
Spread the love

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) ने यंदाही १०० टक्के राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप आणि प्लेसमेंटचा मानाचा टप्पा गाठला आहे. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित हॉस्पिटॅलिटी ब्रँड्समध्ये इंटर्नशिप व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

पंचतारांकित हॉटेल्स, लक्झरी हॉस्पिटॅलिटी ब्रँड्स, प्रीमियम कॅफे, रेस्टॉरंट्स आणि सेवा क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांनी यावर्षी SCHMTT च्या विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड केली.

संस्थेच्या उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, प्रत्यक्ष प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या दृढ संबंधांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, कुलिनरी ऑपरेशन्स, कॅफे मॅनेजमेंट आणि कस्टमर सर्व्हिस अशा विविध विभागांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या.

या माध्यमातून त्यांना जागतिक हॉस्पिटॅलिटी मानके, बहुसांस्कृतिक कार्यसंस्कृती आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

द ओबेरॉय (नरिमन पॉईंट), JW Marriott, Sheraton Grand, Novotel, The Westin, Sayaji Hotel, Starbucks, McDonald’s, The Corinthians Resort & Club, Waters Bar & Kitchen, Café Peter यांसह अनेक नामांकित संस्थांनी विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची वाट निवडली असून, काहींनी कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार करत उद्योजकतेच्या क्षेत्रातही यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.

संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलने उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करत विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, प्लेसमेंट, करिअर मार्गदर्शन आणि उद्योग संवादाचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, कौशल्य विकास आणि १०० टक्के राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप व प्लेसमेंटच्या भक्कम परंपरेमुळे SCHMTT हे हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पसंतीचे संस्थान ठरत आहे.

सध्या हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल टुरिझम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आवाहन करण्यात आले आहे.