आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 9, 2026
Spread the love

बार्शी : महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२५–२६ च्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील ७९ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे. तसेच इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ९६ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी २७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.

अशा प्रकारे दोन्ही गटांतील एकूण १७५ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी ४४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

या यशामागे शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची मेहनत मोलाची ठरली आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना एस. डब्ल्यू. करंजकर, स्वप्निल पाटील, पी. एस. जाधव, जे. एम. तोगे, व्ही. डी. चव्हाण, ए. आर. जाधव, एस. एस. शेळके आणि व्ही. बी. पवार यांनी विशेष मार्गदर्शन केले.

तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना एस. एम. डिसले, एस. एल. देशमुख, ए. व्ही. पवार आणि पी. सी. जुगदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए. पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या डॉ. मिराताई यादव, सदस्य एस. बी. शेळवणे व बी. के. भालके, सर्व कार्यकारिणी सदस्य, संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर अशीच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.