आषाढी वारीपूर्वी बार्शी तालुक्यात पोलीसांचा गुन्हेगारांवर धडाका
रेकॉर्डवरील ५३ सराईत आरोपींवर प्रतिबंधक कारवाई : सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : आगामी आषाढी वारी तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बार्शी तालुका पोलीस स्टेशनकडून रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५३ आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, तसेच बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
आगामी आषाढी वारी आणि विविध सण-उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावेत, तसेच रेकॉर्डवरील, ‘टू प्लस’ व सराईत गुन्हेगारांमध्ये सुधारणा होऊन त्यांनी कायद्याचे पालन करावे व पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
त्याच मोहिमेअंतर्गत आज एकूण ५३ आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. ही कारवाई बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, बीट अंमलदार सदाशिव गवळी, सोमनाथ खांडेकर, अरुण डुकळे, प्रदीप चौधरी, गणेश दळवी तसेच बार्शी तालुका पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधक कारवाया सातत्याने राबविण्यात येत असून, भविष्यातही या मोहिमा अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
