स्वानंद महिला संस्था, पुणे व गेलडा परिवाराचा वारकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आषाढी वारीच्या पावन निमित्ताने स्वानंद महिला संस्था, पुणे यांच्या पुढाकाराने तसेच गेलडा परिवार आणि ज्योती भटेवरा यांच्या सहकार्याने वारकरी दिंडींसाठी ७५१ स्टीलच्या ताटांचे वितरण करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमाचा लाभ शेकडो वारकऱ्यांना झाला. वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होत समाजाप्रती आपली बांधिलकी जपत हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबद्दल वारकरी बांधवांनी स्वानंद महिला संस्था, पुणे, गेलडा परिवार आणि ज्योती भटेवरा यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
