बार्शीत आज ‘स्वास्थ्य-संवाद’ कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन
कॅन्सर, हृदयरोग, बीपी, शुगरसह निरोगी जीवनशैलीवर होणार सविस्तर संवाद
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शीकर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजता मोरया फंक्शन हॉल, बार्शी येथे ‘स्वास्थ्य-संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा उपक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), बार्शी यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी महाराष्ट्र, लायन्स क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब बार्शी रॉयल, लायन्स क्लब बार्शी तेजस्विनी, लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन युथ, इनरव्हील क्लब बार्शी, ब्राह्मण महासंघ बार्शी, स्वर्णिम आरोग्यम समिती बार्शी आणि राजस्थानी महिला मंडळ, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात बार्शीतील तज्ज्ञ डॉक्टर कॅन्सर, हृदयरोग, उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), संतुलित आहार, निरोगी जीवनशैली, विविध आजारांचे प्रतिबंध, आरोग्य संवर्धन तसेच दैनंदिन जीवनात आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या आरोग्य जनजागृती उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी बार्शीकर नागरिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
