आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ए रायझिंग सायन प्रीस्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 11, 2026
Spread the love

पुणे : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अरहम फाउंडेशन संचालित ए रायझिंग सायन प्रीस्कूलमध्ये पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यात चिमुकल्या बालवारकऱ्यांनी त्यांच्या माता व आजींसह पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग गायन, भजन आणि दिंडी काढून महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा अनुभव लहानग्यांनी घेतला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संस्कार आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. श्रद्धा, एकता, नम्रता आणि कृतज्ञता या मूल्यांचे महत्त्वही यावेळी पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमाला अरहम फाउंडेशनच्या उपाध्यक्षा प्रीती पगारिया तसेच सदस्या राजश्री पगारिया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रीस्कूलच्या प्राचार्या पूजा ठक्कर तसेच शिक्षिका नियती ठक्कर आणि संध्या यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या प्रीस्कूलच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.