आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्याच्या विकासासाठी पीएमआरडीएचा मास्टर प्लॅन गतिमान करा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 11, 2026
Spread the love

पुणे : पुणे जिल्ह्याच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सह आयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे, सह आयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, प्रभारी सह आयुक्त (अनधिकृत बांधकाम) हिम्मत खराडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता (अभियांत्रिकी विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, प्रभारी मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह पीएमआरडीएचे संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विस्तार आहे.

पुणे महानगर प्रदेशाचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे.