सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टचा उपक्रम; गुरुजन व मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श परिवार’ गौरव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
गुरुदेव प. पू. रामनिकमुनीजी म. सा. (वाणीचे जादूगार) यांचा विशेष सन्मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आणि कुटुंबांचा गौरव करणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी जैन समाजातील समाजसेवा, सामाजिक विकास आणि सामुदायिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि कुटुंबांचा आदर्श माता-पिता, आदर्श परिवार, समाज शिरोमणी, समाज भूषण, समाज रत्न, मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार आणि ‘आयकॉन ऑफ राजस्थान’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येतो.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सूर्यदत्तचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा पुरस्कार गुरुदेव प. पू. रामनिकमुनीजी म. सा (वाणी के जादूगर) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांच्या असामान्य आध्यात्मिक प्रवासाचा, समाजासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा आणि मानवसेवेसाठी केलेल्या प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कारार्थींना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पारंपरिक शाल (उपरना) देऊन गौरविण्यात येणार आहे. या प्रतिष्ठित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ व IISER चे सल्लागार श्री. अरविंद नाटू, तर विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते रझा मुराद तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कारांसोबतच जैन, गुजराती, माहेश्वरी आणि अग्रवाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
“पात्र विद्यार्थ्यांनी सूर्यदत्तच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ‘Meritorious Student Felicitation Form’ भरावा आणि सत्कार समारंभाला विद्यार्थ्यांची वैयक्तिक उपस्थिती अनिवार्य आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.
हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासोबतच त्यांना त्यांच्या करिअर आणि जीवनातील योग्य संधी व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरतो. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
दिनांक : रविवार, २७ सप्टेंबर २०२६
स्थळ : साधना सदन, शिवशंकर सभागृह, महर्षी नगर, पुणे – ४११०३७
वेळ : रिपोर्टिंग – दुपारी ३.०० वाजता (कृपया वेळेवर उपस्थित राहावे.)
नामांकनासाठी लिंक – https://forms.gle/TasJL7HDQa97HkK99
नामांकनाची अंतिम तारीख – शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६.
गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी पात्रता – खालीलपैकी कोणतीही एक पात्रता पूर्ण करणारे विद्यार्थी सत्कारासाठी पात्र असतील :-
- कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक बोर्डातून वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १० वी किंवा इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेले आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी. (जून, जुलै किंवा ऑगस्ट २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.)
- कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण केलेले विद्यार्थी. (जून, जुलै किंवा ऑगस्ट २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.)
- फार्मसी, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि तत्सम चार वर्षांचे पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण केलेले विद्यार्थी. (जून, जुलै किंवा ऑगस्ट २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.)
- पदव्युत्तर व तत्सम अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण केलेले विद्यार्थी. (जून, जुलै किंवा ऑगस्ट २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असतील.)
- शैक्षणिक वर्ष २०२६ मध्ये Ph.D. पूर्ण केलेले विद्यार्थी.
- २०२६-२७ मध्ये IIT, IIM यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमध्ये तसेच MBBS, MD आणि तत्सम अभ्यासक्रम देणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये निवड होऊन प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
- CA, CS, ICWA आणि तत्सम परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
- शैक्षणिक वर्ष २०२६ मध्ये प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळविलेले विद्यार्थी.
