आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गणेश विसर्जन बंदोबस्तातील पोलिसांसाठी सेवा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 29, 2026
Spread the love

पुणे ; गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान सलग ४० तास रात्रंदिवस बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस बांधवांसह स्वयंसेवकांसाठी जनहितम् संघटना व बिबवेवाडी वारकरी सेवा मंडळाच्या वतीने गेल्या २१ वर्षांपासून निःस्वार्थ सेवा उपक्रम राबविला जात आहे. यंदाही ५२५० पोलीस बांधव व स्वयंसेवकांसाठी स्नेहभोजन, फूड पॅकेट, नाश्ता, पाणी तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

स्वारगेट पोलीस स्टेशनच्या आवारात राव हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन एसीपी गजानन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संजय पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते-पाटील, उपआयुक्त, यशवंत निकम, स्वारगेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जितेंद्र कदम, वेलफेअर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विकास भारमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) तसेच ‘सकाळ’चे वरिष्ठ पत्रकार अनिल सावळे यांचा सत्कार करण्यात आला.

या उपक्रमाचे आयोजन जनहितम् संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामविलास माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी राजेश चाहर, नितीन चोरडिया, रितेश राठी, राजेंद्र चोपडा, नितीन डांगी, निखिल राठी, अशोक चौधरी, नितीन ब्राह्मणकर, ज्योती महाबळेश्वरकर, फिरोज शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.