चित्रकला स्पर्धेने हिंदी पखवाड्याचा समारोप
शंकरराव पाटील महाविद्यालयात विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालयात हिंदी विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी पखवाड्याचा समारोप २९ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रकला स्पर्धेने करण्यात आला. या पखवाड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे, डॉ. तानाजी बोराडे तसेच आयक्यूएसी समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे उपस्थित होते. हिंदी पखवाड्याचा शुभारंभ १५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेने करण्यात आला. त्यानंतर निबंध लेखन, हिंदी स्लोगन लेखन, श्रुतिलेखन, हिंदी भाषण, काव्यवाचन आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कुंभार राज नंदिनी रंजीत, द्वितीय क्रमांक दीक्षा नवनाथ जाधव आणि तृतीय क्रमांक धनश्री तानाजी बाराते यांनी मिळविला. ऑनलाइन हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेत गीतांजलि शंकर चकोर यांनी प्रथम, प्रदीप युवराज ढगे यांनी द्वितीय, तर सानिया साहेबराव अंधारे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
निबंध लेखन स्पर्धेत शेख समीना समीर प्रथम, स्नेहा विलास सीतापे द्वितीय आणि रोशनी धनंजय जाधव तृतीय ठरल्या. हिंदी स्लोगन लेखन स्पर्धेत स्नेहल सतीश शेलार यांनी प्रथम, मानसी सुनील टकले यांनी द्वितीय आणि नेहा नवनाथ गवारे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
श्रुतिलेखन स्पर्धेत तनुजा विनोद कोळेकर प्रथम, तन्वी गणेश द्वितीय आणि राधा परमेश्वर नागटिळक तृतीय ठरल्या. हिंदी भाषण स्पर्धेत प्रगती औदुंबर भारती यांनी प्रथम, आदित्य गोरोबा गाढवे यांनी द्वितीय आणि आकांक्षा माणिक थोरात यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
काव्यवाचन स्पर्धेत सायली बाळासाहेब चौधरी यांनी प्रथम, सीमा बबन पवार यांनी द्वितीय आणि स्नेहल रवींद्र जगदाळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
हिंदी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड, अभिरुची आणि सर्जनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हिंदी विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. राजश्री तावरे, डॉ. ज्योती डुंगरवाल आणि डॉ. शामसुंदर आगे यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.