आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे विमानतळावर कॉस्मेटिकच्या डब्यात १ कोटींचे हशिश

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 3, 2026
Spread the love

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या विमानातील प्रवासी महिलेने कॉस्मेटिकच्या डब्यांमधून अंमली पदार्थ लपवून आणल्याचे कस्टम आणि महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. आंतरराष्ट्रीय बाजारात १ कोटी रुपये किंमत असलेले १ किलो २४३ ग्रॅम हशिश / कॅनाबिज एक्स्ट्रॅक्ट जप्त केले आहे.

कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून १ ऑक्टोबर रोजी एअर इंडियाचे विमान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, या विमानाने आलेल्या महिलेच्या सामानाची तपासणी करण्यात आली.

या वेळी तीन व्यावसायिक कॉस्मेटिक डब्यांमध्ये तीव्र वास असलेला मेणासारखा पदार्थ आढळून आला. सौंदर्यप्रसाधनांच्या दोन डब्यांमध्ये “Rice and Yolk Hair Treatment”, तर एका डब्यावर “Body Scrub” असे नमूद करण्यात आले होते.

नार्कोटिक ड्रग फील्ड टेस्टिंग किटच्या प्राथमिक तपासणीत या पदार्थांमध्ये कॅनॅबिस असल्याचे संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर १ कोटी २३४ ग्रॅम हशिश / कॅनॅबिस एक्स्ट्रॅक्ट असल्याच्या संशयावरून एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत हे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून, कथित अमली पदार्थांचा स्रोत आणि इतर संभाव्य संबंधांचा तपास सुरू आहे.