आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व व्याख्यानाचे आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 3, 2026
Spread the love

भूम : शंकरराव पाटील महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने दि. ३ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन पडवळ होते. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. महेश सूर्यवंशी यांनी “महात्मा गांधी : जीवन, विचार आणि कार्य” या विषयावर मार्गदर्शन केले.

त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा तसेच सत्य, अहिंसा, स्वावलंबन व स्वच्छतेच्या विचारांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. यावेळी महाविद्यालय समन्वयक डॉ. शामसुंदर आगे यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ केला.

स्वच्छतेचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास डॉ. तानाजी बोराडे, डॉ. गोकुळ सुरवसे, डॉ. मंगेश खराटे, प्रा. खंदारे, डॉ. गायकवाड, डॉ. भोंग, डॉ. माळी, डॉ. दुनघव यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.