अविष्कार जिल्हास्तरीय स्पर्धेत शंकरराव पाटील महाविद्यालयाचे यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ‘अविष्कार’ स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत शंकरराव पाटील महाविद्यालय, भूमच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी आकांक्षा थोरात हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला, तर दीक्षा डोंबाळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘अविष्कार’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचाही सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
या विद्यार्थिनींना डॉ. शिवशरण माळी आणि प्रा. गोपाळ खंदारे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे सर, प्रा. डॉ. तानाजी बोराडे सर, प्रा. डॉ. नितीन पडवळ सर, IQAC समन्वयक डॉ. गोकुळ सुरवसे, डॉ. रमेश गायकवाड, प्रा. पूनम सुतार मॅडम, प्रा. अमोल कुटे, प्रा. डॉ. नंदू जगदाळे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानाला नवी दिशा मिळाली असून, महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.
