आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सिद्धार्थ मुथा यांना पीएचडी पदवी प्रदान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 7, 2026
Spread the love

पुणे : आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेले सिद्धार्थ मुथा यांनी व्यावसायिक व्यवस्थापन विषयात संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.

डॉ. सिद्धार्थ मुथा यांनी ‘ए स्टडी ऑफ स्ट्रॅटेजीज अँड चॅलेंजेस ऑफ स्टार्टअप बिझनेसेस टू क्रिएट सक्सेसफुल बिझनेस मॉडेल्स विथ रेफरन्स टू द पुणे रीजन’ या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला.

या संशोधनासाठी त्यांना डॉ. गणेश पटारे यांचे मार्गदर्शन लाभले. स्टार्टअप व्यवसायांसमोरील विविध आव्हाने, व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक रणनीती आणि यशस्वी व्यवसाय मॉडेल विकसित करण्याच्या प्रक्रियेचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे.

डॉ. सिद्धार्थ मुथा यांचे हे संशोधन उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.