आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घोरपडे पेठेतील शंकर मंदिरात चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 9, 2026
Spread the love

पुणे : घोरपडे पेठेतील घोरपडे उद्यानाच्या आवारात असलेल्या शंकर मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत अरुण बजरंग जाधव (वय ३५, रा. कैकाड आळी, घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेत पुणे महापालिकेचे श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान आहे.

या उद्यानाच्या आवारात श्री शिव मंदिर आहे. चोरट्याने मंदिराच्या आवारातील दानपेटीचे कुलूप तोडले. दानपेटीतील सुमारे साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी उद्यानाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार हेमंत पेरणे तपास करीत आहेत.