आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१२ लाख ७५ हजारांचे ५१ मोबाईल, टॅब नागरिकांना परत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 23, 2026
Spread the love

पुणे : नागरिकांचे गहाळ झालेले, हरवलेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल आणि टॅब यांचा शोध घेऊन वाघोली पोलीस ठाण्यातील सायबर विभागाने विविध राज्यांतील पोलिसांशी संपर्क साधून ५१ मोबाईल आणि टॅब परत मिळवले. हे मोबाईल आणि टॅब एका साध्या समारंभात नागरिकांना परत करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस अंमलदार सतीश बिरादार आणि वृंदावणी चव्हाण यांनी गहाळ झालेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांचे लोकेशन शोधले.

त्यानुसार विविध राज्यांतील स्थानिक पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून हे मोबाईल प्राप्त केले. अशा प्रकारे १२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि टॅब मूळ मालकांना परत करण्यात आले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार आणि सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पल्लवी मेहेर, पोलीस अंमलदार सतीश बिरादार आणि वृंदावणी चव्हाण यांनी केली.