आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मोबाईल हॅक होऊन गेलेले पैसे दिले मिळवुन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 28, 2026
Spread the love

पुणे : मोबाईलमधील अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने मोबाईलमध्ये जॉय व्हीपीएन नावाचा व्हायरस इन्स्टॉल झाला होता. त्यामुळे मोबाईल हॅक होऊन महिलेच्या खात्यातील रक्कम काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. येरवडा पोलिसांनी ही रक्कम परत मिळवून दिली आहे.

येरवडा येथील एका महिलेने मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने त्यांच्या मोबाईलमध्ये जॉय व्हीपीएन नावाचा व्हायरस इन्स्टॉल झाला. त्यामुळे मोबाईल हॅक होऊन त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेण्यात आले आणि त्यांची फसवणूक झाली.

येरवडा पोलिसांच्या सायबर सेलने या महिलेच्या मोबाईलमधून व्हायरस काढून डेटा सुरक्षित करून दिला. फसवणूक झालेल्या पैशांबाबत बँक आणि मर्चंट यांच्याशी पत्रव्यवहार केला, तसेच फोनद्वारे संपर्क साधून पैसे गोठविण्यास सांगितले. बँकेकडे पाठपुरावा करून फसवणूक झालेली संपूर्ण ४० हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात येरवडा पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाला यश आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे आणि शारदा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, हवालदार समीर पिलाने, पोलीस अंमलदार मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे, मीनाक्षी कापडे आणि भोकसे यांनी ही कामगिरी केली.