आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अविष्कार २०२७ मध्ये सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांची चमक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 2, 2026
Spread the love

पुणे : १९९९ मध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण योगदान देण्याच्या ध्येयाने स्थापन झालेल्या सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या (एसईएफ) सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने संशोधन, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. याच परंपरेला पुढे नेत सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी झोनल स्तरावरील ‘अविष्कार २०२७’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

स्पर्धेसाठी महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी संतोषी चौधरी हिने प्युअर सायन्सेस विभागात तृतीय क्रमांक, तर आंचल त्रिपाठी हिने इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागात चतुर्थ क्रमांक पटकावला.

संतोषी चौधरी हिने ‘फ्रेश चेक – अॅनाट्टो चिटोसन बायोडिग्रेडेबल फिल्म फॉर पीएच रिस्पॉन्सिव्ह फूड पॅकेजिंग’ हा संशोधन प्रकल्प सादर केला.

अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी अॅनाट्टो आणि चिटोसन यांच्या साहाय्याने जैवविघटनशील तसेच पीएचमधील बदलांना प्रतिसाद देणारी फिल्म विकसित करण्यावर या प्रकल्पात भर देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी तिला डॉ. वैशाली परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

आंचल त्रिपाठी हिने ‘स्मार्ट डोस – अ मेकॅनिकल बटण ऑपरेटेड फिक्स्ड ५ एमएल लिक्विड मेडिसिन डिस्पेंसर’ हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला.

द्रवरूप औषधांचा अचूक ५ मिली डोस सहजपणे देता यावा, या उद्देशाने या उपकरणाची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी भाग्यश्री पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

झोनल स्तरावरील ‘अविष्कार २०२७’ स्पर्धेचे आयोजन समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे येथे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प सादर करण्याची, आपल्या कल्पना मांडण्याची आणि इतर संशोधक विद्यार्थ्यांशी ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली.

या यशाबद्दल संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आणि सह-उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील संशोधन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण सहभागाचे समन्वयन मुख्य समन्वयक डॉ. सारिका झांबड यांनी केले. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करण्यात आणि स्पर्धेच्या तयारीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या वेळी डॉ. वैशाली परदेशी, भाग्यश्री पवार आणि संबंधित प्राध्यापकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.