आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अमित शहा यांची भारतीय जैन संघटनेच्या कार्यालयाला भेट

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 16, 2026
Spread the love

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी आज सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय जैन संघटनेच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली तसेच संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेच्या कार्याचा आणि भविष्यातील उपक्रमांचा आढावा सादर केला.

अमित शहा यांनी संघटनेच्या विविध कार्यांची माहिती जाणून घेतली. या वेळी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.