आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘विठू माऊली माझी’ अभंगवाणीचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम शनिवारी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 20, 2026
Spread the love

पुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने शनिवारी (दि. २१) ‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ६ वाजता होणारा हा कार्यक्रम यंदा २७ व्या वर्षात असून, भाविक व रसिकांना संतांच्या अभंगांचा आणि विठ्ठल भक्तीचा आनंद अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमात सुरजन खंडाळकर, प्रज्ञा देशपांडे आणि मयुरी अत्रे गायन सादर करणार आहेत. त्यांना डॉ. नरेंद्र चिपळूणकर (हार्मोनियम), अमृता ठाकूर देसाई (सिंथेसायझर), शैलेश देशपांडे (बासरी व झायलोफोन), डॉ. राजेंद्र दुरकर (तबला), पद्माकर गुर्जर (पखवाज) आणि राजेंद्र साळुंखे (तालवाद्य) साथसंगत करणार आहेत. रविंद्र खरे निरूपण करणार असून, ध्वनी व्यवस्था नुपूर ऑडिओच्या कांबळे यांच्याकडे आहे.

कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीकांत खाबिया, विवेक थिटे, राहुल देशपांडे आणि नमोल खाबिया यांनी केले आहे. गेल्या २७ वर्षांपासून सुरू असलेली अभंगवाणीची ही परंपरा पुणेकरांच्या मनात भक्तिभाव जागवणारी ठरली आहे. कार्यक्रमाचा प्रवेश विनामूल्य असून, पहिल्या दोन रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विठू माऊलीच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी भाविक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत खाबिया (९८२२०९३३६६) यांच्याशी संपर्क साधावा.