आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जीतो पुणेचे महिलांसाठीचे काम कौतुकास्पद – वैशाली कराड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • November 28, 2026
Spread the love

पुणे : महिलांचे आरोग्य उत्तम असेल तर, कुटुंब उत्तम राहील. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे, व्यायामाकडे आणि आहाराकडे लक्ष्य देऊन जागरुक राहिले पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध उद्योजिका वैशाली कराड यांनी केले. जीतो पुणे लेडीज विंगच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अंदाज – नारी, हर साज में एक नई कहानी’ या कार्यक्रमात वैशाली कराड प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी जीतो संघटनेचे महिला सक्षमीकरणासाठी आणि आरोग्यासाठी सुरु असलेले कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमादरम्यान वैशाली कराड यांनी उपस्थित महिलांना आरोग्य, योग्य आहार, नियमित व्यायाम व व्यावसायिक प्रगती या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.

कामाचा दिवस असूनही हॉटेल शेरेटॉन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांची अत्यंत लक्षणीय उपस्थिती लाभली होती.
जीतो पुणे लेडीज विंगच्या या दिमाखदार कार्यक्रमास लेडीज विंगच्या अध्यक्षा लतिका साकला, मुख्य सचिव वंदना राठोड, सचिव अर्चना कोचर, खजिनदार नम्रता सिंघी, जीतो पुणेचे अध्यक्ष मनोज छाजेड, मुख्य सचिव जिनेंद्र लोढा, खजिनदार मंगेश कटारिया, सहखजिनदार प्रकाश ओसवाल, युथ विंगचे अध्यक्ष ऋषभ दुगड, मुख्य सचिव स्वराज पगारिया, उपाध्यक्ष रोहन सिंघवी, सल्लागार समितीचे विजय भंडारी, रविंद्र साकला, चेतन भंडारी, प्रियांका परमार, लकीशा मर्लेचा, पूनम ओसवाल, एकता भन्साळी, रक्षा खिंवसरा, प्रिती छाजेड, शिल्पा कटारिया, शोभा दुगड, वंदना सोनिग्रा, मनाली साकला, बबीता बोकाडिया, शोभा लोढा, प्रियांका ललवाणी, प्रतिमा दर्डा, आरती बाफना, मयुरी शिंगवी, ऐश्वर्या बलदोटा, कविता मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.