डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक करपे यांच्याशी साधला संवाद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कर्वे रोड येथील विमलाबाई गरवारे प्रशाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस रेझिंग-डे सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती देत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी विमलाबाई गरवारे प्रशालेतील शिक्षकवृंद, पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
करपे म्हणाले की, पोलीस काका, बडी कॉप, दामिनी मार्शल, महिला बालका संरक्षण, पोलीस दीदी अशा अनेक उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांसाठी माहिती दिली. तसेच, संकटप्रसंगी तसेच पोलीस मदतीच्या वेळी पोलीस नियंत्रण कक्ष क्र.१००, अतिमहत्त्वाच्या वेळी क्र.११२, हेल्पलाईन क्र.१०९१, विद्यार्थी बाल हेल्पलाईन १०९८ या हेल्पलाईनची माहिती दिली.
२४ बाय ७ पोलीस जनतेच्या संरक्षणामध्ये असतात. निसंकोचपणे पोलीस हा आपला मित्र आहे, असे समजून कोणतीही अडचण न बाळगता कोठेही कोणत्याही स्वरूपात बेकायदेशीर कृत्य-अत्याचार होत असल्यास माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये कुतुहलपूर्ण शंका, विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भावना समजून घेत त्या शंकांचे निरसन करण्यात आले. पोलीस ठाणे येथे दैनंदिन कामकाज करताना वापरात येणारी हत्यारे (उदा. लाठी, हेल्मेट, ढाल, पिस्तुल, कार्बाईन, गॅसगन, एसएलआर, पंप ॲक्शन, इंसास रायफल, रिव्हॉल्व्हर इ.) या विषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
विद्यालयाच्या वतीने संगीता नाईक, अंजली अनासपुरे यांनी आभार मानले.