सभापतीपदी पूजा विशाल ढगे तर उपसभापतीपदी प्रियंका प्रवीण रणबागुल
भूम : भूम पंचायत समितीवर महिलाराज प्रस्थापित झाले असून सभापतीपदी पूजा विशाल ढगे तर उपसभापतीपदी प्रियंका प्रवीण रणबागुल यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि. ६) उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे आणि तहसीलदार जयंवत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
सभापतीपदासाठी १० पैकी ६ मते मिळाल्याने पूजा विशाल ढगे यांची निवड निश्चित झाली. त्याचप्रमाणे उपसभापतीपदासाठीही १० पैकी ६ मते मिळवत प्रियंका प्रवीण रणबागुल यांनी विजय मिळवला. निवड जाहीर होताच पंचायत समितीच्या बाहेर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी शिवसेना नेते व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, शिवजल क्रांतीचे अध्यक्ष प्रा. रामचंद्र घोगरे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, कृउबा संचालक व मानकेश्वरचे उपसरपंच विशाल अंधारे, चिंचपूरचे सरपंच विशाल ढगे, माजी सभापती निलेश शेळवणे, वारे वडगावचे सरपंच दत्ता नलवडे, जयसिंग गोपणे, रामकिसन गव्हाणे, देवळालीचे गटनेते समाधान सातव, युवराज तांबे, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अर्चना दराडे, महादेव वारे, अख्तर जमादार यांच्यासह शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















