भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील ५१ वर्षीय नागरिकाने केली तक्रार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधणे एका नागरिकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सायबर चोरट्याने त्यांना अॅप डाऊनलोड करायला सांगून त्यात माहिती भरायला लावून तब्बल पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातला. ही घटना १९ व २० जुलै २०२१ दरम्यान घडली.
याप्रकरणी कात्रज येथील ५१ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांनी गुगल पेवरुन रिचार्ज केले असताना ते झाले नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधला. हे नंबर सायबर चोरट्यांनी टाकले होते. त्यावरील दोन क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असताना त्यांनी फिर्यादीला एनीडेक्स अॅप डाऊनलोड करावयास सांगितले व त्यात त्यांना माहिती भरायला सांगितली. त्यानुसार फिर्यादी व फिर्यादीचे वडिलांच्या अॅक्सिस व एसबीआय बँक खात्याची माहिती घेऊन त्या खात्यातून थोडी थोडी करुन १ लाख ७४ हजार ९६० रुपये काढून घेऊन फसवणूक केली.














