भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगाव बुद्रुक येथील दत्तनगर-गायमुख रस्त्यावर झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पती-पत्नी मोटारसायकलवर दत्तवाडी-गायमुख दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना अपघात झाला, या अपघातामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात १० फेब्रुवारी २०२२ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील मल्हार सोसायटीसमोर झाला.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेश गोसावी यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, अंकुश लोहकरे पत्नी संगीता लोहकरे यांना घेऊन मोटारसायकलवरून दत्तनगर-गायमुख रस्त्यावरून जात होते. भरधाव दुचाकी घसरून अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार योगेश कदम पुढील तपास करीत आहेत.
