खडक पोलिसांत होता गुन्हा दाखल : आरोपी फिर्यादी मित्र-मैत्रणी होते
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश लक्ष्मण तोंडे (वय-20) याची पॉक्सो गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपी तोंडे याची विशेष सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी निर्दोष मुक्तता केल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडीत मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रथमेश तोंडे याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन खडक पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र व वकीलांचा न्यायालयात युक्तिवाद सन 2019 मध्ये यातील पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम 354ड व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु, यातील फिर्यादी व आरोपी हे आधीपासून एकमेकांचे मित्र-मैत्रिणी आहेत व त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांला विरोध असल्याकारणाने कुटुंबीयांच्या दबावाखाली सदरचा गुन्हा दाखल केल्याचे पुरावे आरोपीच्या वतीने ॲड विजयसिंह ठोंबरे व ॲड हितेश सोनार यांनी न्यायालयासमोर सादर केले.
तसेच, फिर्यादी व अभियोग पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षीने सदरचा गुन्हा सिद्ध होत नसून, याउलट आरोपी पक्षाने दिलेल्या पुराव्याने आरोपीस खोट्या गुन्ह्यात गुंतवले असल्याचे दिसून येत असल्याने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याबाबतचा युक्तिवाद आरोपीतर्फे सादर करण्यात आला होता. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत विशेष सत्र न्यायाधीश अनील वेदपाठक यांनी आरोपी प्रथमेश तोंडे याची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार व विष्णू होगे यांनी काम पाहिले.
