आवृत्ती पुणे

मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून पाच मोटारी, दोन मोबाईल असा एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. विशाल ऊर्फ बिच्या गोटुराम काळे (वय १९, … Read more

बाप रे… 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुला -सुनेकडून मारहाण

फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल : काठीने मारल्याने हात झाला फॅक्चर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ८० वर्षाच्या जन्मदात्या आईला ६० वर्षाच्या मुलाने काठीने मारुन तसेच ५५ वर्षाच्या सुनेने चपलेने मारहाण केली. काठीने मारहाण केल्याने वृद्ध आईचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी जखमी झालेल्या महिलेच्या 60 वर्षीय मुलावर आणि 55 वर्षीय सुनेविरूध्द गुन्हा … Read more

लोणी काळभोरमधील सराईत राज रविंद्र पवार दोन वर्षासाठी तडीपार

उपायुक्त नम्रता पाटील यांचा आदेश : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता गुन्हेगारी कमी करण्यासाठी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, तडीपार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार (वय-24 रा. कवडीपाट टोल नाका, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर) … Read more

मनाविरुद्ध पीएच.डी. करते म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्याविरूध्द गुन्हा

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा : वांजोटी असे बोलून मानसिक व शारिरीक त्रास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विरोध असतानाही पीएच.डी. करते, तसेच मुल होत नाही, म्हणून पत्नीला मारहाण करुन उपाशी ठेवून छळ केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पती विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 37 … Read more

माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माचिस नाही असे सांगितल्याने दोघांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडला आहे. हा प्रकार कॅम्पमधील कुरेशी मस्जिदजवळ सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी आशिष महेंद्र शर्मा (वय ३२, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) … Read more

पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

अपर पोलीस आयुक्त डॉ. सुपेकर : बुधवारपासून आदेश जारी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि. ९ डिसेंबर २०२१) रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आदेश काढले आहेत.पोलीस निरीक्षकांची बदली … Read more

लातूरच्या प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांसह पाचजण जेरबंद

आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरण : सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून या प्रकरणात पोलिसांनी आणखी पाच … Read more

तरूणीला गुंगीचे औषध देऊन सलग 4 दिवस लैंगिक अत्याचार

केशवनगर परिसरातील घटना : मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्राने तरुणीच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार दिवस तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर … Read more

किरकोळ वादातून संतापलेल्या पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यातील भवानी पेठेत घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज परिसरात सोमवारी भरदिवसा गोळ्या घालून एकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक खूनाची घटना घडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या पती आणि पत्नी यांच्यात झालेला वाद विकोपाला … Read more

‘चेअरमनने किया वैसाही मै करुंगा’ !

कोंढवा पोलिसांत गुन्हा : लुल्लानगरमधील सोसायटीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीमधील वादातून चेअरमनविरोधात विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर सोसायटीमधील एका सदस्याने हा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी फिर्यादीचा पाठलाग करुन तिला हातवारे करुन मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जुलै २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी ४० वर्षाच्या … Read more