अपर पोलीस आयुक्त डॉ. सुपेकर : बुधवारपासून आदेश जारी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि. ९ डिसेंबर २०२१) रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आदेश काढले आहेत.
पोलीस निरीक्षकांची बदली कोठून कुठे झाली –
१) प्रताप विठोबा मानकर (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन), २) अनिल बाबुराव शेवाळे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), ३) अजय भिमराव वाघमारे (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा), ४) राजेंद्र विठ्ठल सहाणे (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन), ५) युसूफ नबिसाब शेख (विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन), ६) अशोक धर्माजी इंदलकर (कोर्ट आवार ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन), ७) विनायक बाजीराव वेताळ (गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन), ८) बाळकृष्ण सीताराम कदम (नियंत्रण कक्ष (पुढील आदेश होईपर्यंत पोलीस कल्याणचे कामकाज पाहतील).