आवृत्ती पुणे

पोलीस आल्याचे पाहताच चोरट्यांनी काढला पळ

कोंढवा पोलिसांत गुन्हा : महंमदवाडीमधील मार्गोसा सोसायटीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महंमदवाडीमधील मार्गोसा हाइट सोसायटीसमोरून मोटारसायकलवरून जात असताना तिघांनी कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तेथे पोलीस आल्याचे दिसताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना शुक्रवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. हातीम … Read more

कुख्यात गुंड मारणे टोळीतील अट्टल गुन्हेगार रूपेश मारणे स्थानबध्द !

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 50 जणांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगार रुपेश कृष्णराव मारणे (वय -38 रा. नवएकता कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 50 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत … Read more

पिस्तुलातून उडालेल्या गोळीतून कोल्हापूरचा तरुण गंभीर जखमी

पुण्याच्या वारजे माळवाडी मधील घटना : पिस्तूलासह 15 जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीला भेटून ते परत जात होते. कारमध्ये बसताना त्यांच्या हातातील बॅग पडली आणि त्यातील परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी उडाली. ती नेमकी बरोबर असलेल्या चुलत भावाच्या हातात घुसली. वारजे माळवाडी येथील हैदराबाद बिर्याणीसमोर शनिवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार … Read more

एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीच्या परीक्षेत मुन्नाभाईचा प्लान फसला

कोथरूडमधील मोरे विद्यालयातील प्रकार : औरंगाबादच्या कॉपीबहाद्दरावर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची लेखी परीक्षा (रविवार, दि. १३ डिसेंबर २०२१) पुण्यात झाली. पोलीस भरतीची परीक्षा सुरळीत व्हावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके कार्यरत होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकाला मोबाईलचा वापर करुन कॉपी … Read more

कोंढव्यातील त्या बंगल्यावर पोलिसांचा छापा!

५८ लाखांचा ऐवज जप्त : सामाजिक सुरक्षा पथकाची मोठी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील सैनिकनगर परिसरातील क्लाऊड नाईन सोसायटीमधील बंगल्यात वास्तव्यास राहणाऱ्या जितेन जगदिप सिंग याच्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. त्याच्या बंगल्यातून विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर जुगाराची साधने, 46 लाख 76 हजार 500 रूपये आणि ऑस्ट्रेलियन 5500 … Read more

तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्‍याची येरवड्यात रवानगी

न्यायालयाने सुनावली शिक्षा : पुण्यातील तळजाई जंगलात घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्रानेच वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह 22 वर्षीय तरुणीला तळजाई येथील जंगलात नेऊन त्याठिकाणी दारु पाजून बलात्कार केल्याप्रकरणात सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या शुभम सिताराम शिंदे (वय १९, रा. धनकवडी) याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला … Read more

कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून लोहगाव विमानतळात शिरणारा अटकेत

सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे पकडला गेला : बनावट व्हिसा, विमान तिकीट बनवून गैरवापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नोकरी गेल्याने त्याला अमेरिकेहून घरी यावे लागले होते. आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले. बनावट तिकीट व व्हिसाही तयार केला. आपण खरेच कॅनडाला जात असल्याचे दाखविण्यासाठी त्याने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवेशही केला. तेथून बाहेर पडत … Read more

अवैध सावकारी करणाऱ्यांवर १८ गुन्हे दाखल

पोलीस आयुक्तांचे आदेश : परिमंडल आणि गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये अवैध सावकारी करून पैसे वसूल करण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अवैध सावकारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार खास पथके तयार केली. विशेष पथकाने १ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत सावकारी कायदा कलम ३९, ४५ व भादवि … Read more

विक्रेत्यांना खंडणी मागणाऱ्यांना १२ तासांत केले जेरबंद

लष्कर पोलीस स्टेशनची कारवाई : लष्करमधील बिशप स्कूलशेजारी केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शानू शफिक शेख (वय १९, पथरी, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे), आर्शद आयुब पठाण (वय २५, अंध शाळेसमोर, रामटेकडी, हडपसर, पुणे), रिहान नझीर अहमद शेख (वय २५, सवेरा पार्क, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी सद्याम असिमुददीन … Read more

तरूणावर वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : सुतारदरा येथे घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुडमधील सुतारदरा येथे कट्ट्यावर बसला म्हणून एका टोळक्याने कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ७ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. याप्रकरणी सचिन दत्तात्रय नवस्कर (वय ३१, रा. मराठा मावळ कॉलनी, सुतारदरा) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more